जेष्ठ शुद्ध पोर्णिमेला वड पोर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सुवासनी वडाची पूजा करून सवित्रिच्या कथा ऐकतात. आपल्या पतीला उदंड आयुष्य मागतात.
वडाच्या झाडाला अक्षय वट असे म्हणतात, कारण एक झाडाच्या पारंब्यापसून नवे झाड तयार होते. हा वृक्ष कधीच नाश पावत नाही. त्याचा खूप मोठा विस्तार असतो. दाट पाने - गार सावली - ऐन उन्हाळ्यात हि थंड हवा हा वृक्ष देतो. पाऊस पडण्यास ह्याचा उपयोग होतो. जमिनीची धूप हा वृक्ष होऊ देत नाही. पक्षांचे निवासस्थानही हा वृक्ष असतो. जेष्ठ महिन्यात मृग नक्षत्र असते. पाऊसास सुरुवात होते. खरिप पिकांना हा पाऊस आवश्यक असतो, म्हणून शेतकरी पावसाची वाट पहात असतात. पाऊस भरपूर पडावा, जमीन सुजला सुफला बनावी म्हणूनच या महिन्यात वृक्ष पूजा केली जाते. पतीनिष्ठेची शिकवण या वृक्ष मुले मिळते, शील, परम भूशनम हा संदेश हा सण आपल्याला देतो. घराचे सौख्य स्त्रीच्या वागणुकीवर अवलंबून असते. गृह देवतेचा सन्मान ठेवणे हे पुरुषाचे कर्तव्य आहे, हे ह्या सणामुळे दिसून येते.