विशाखा नक्षत्र या पौर्णिमेला चंद्राबरोबरच सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवते, म्हणून वैशाख असे नाव पूर्वजांनी ह्या महिन्याला दिले आहे.
परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि : क्षत्रिय केली, त्या परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला आहे. त्यांचा चिपळून जवळ ह्या दिवशी जन्म उत्सव थाटाने होतो.
पाडवा - बलिप्रतिपदा - दसरा हे तीन मुहूर्त व अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त असे आपले साडेतीन मुहूर्त प्रसिद्ध आहेत. यादिवशी शुभ कार्य करतात. ह्या दिवशी आपण जे जे दान, पुण्य कार्य करतो ह्याचे फळ ईश्वर सतत देत असतो. हे फळ अक्षय्य टिकणारे आहे म्हणूनच हि अक्षय्य तृतीया होय.
सर्वात मोठे अन्नदान पण त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे जल दान. ऐन उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी दिले तर ते फार मोठे सत्कृत्य पुण्य दायक असते. म्हणून आपण जल कुंभ दान देतो. पितरांना पण अन्न व जल देऊन त्यांचे पुण्या स्मरण करतो. मग शुभ कार्याला ह्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करतो. चैत्र गौरीचे हळदी कुंकूपण ह्या दिवशी करतात.