Friday, 20 May 2011
Wednesday, 18 May 2011
Tuesday, 17 May 2011
भारत
पाकिस्तानने म्हटलंय की अमेरिकेने जसी लादेनवर कारवाई केली तसी भारताने पाकिस्तानात घुसून करू नये नाहीतर आम्ही भारतातील भरपूर ठिकाणे लक्ष केली आहेत. खर तर पाकिस्तानला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट ती गर्वाने सांगतात.
पण खरं पाहिलं तर भारत तसं करूही शकत नाही, कारण कसाबने जगासमोर अपराध करूनही त्याला अजून काही केले नाही तर ते पाकिस्तानात जाऊन काय करणार, भारताची शासन व्यवस्थाच तशी आहे. अजुन ते कसाबबद्दल कय सिद्ध करतायेत ते देवाला माहिती. तेच जर कोण भारतीय असता आणि त्याने एकतरी अपराध केला असता तर त्याला एवाध्याला फासावर देऊन मोकले झाले असते. पाकिस्तानात जाउन जरी दाउद वैगरेना पकडल तरी त्याच्यावर केस चालविण्यात दाउदचं आयुष्य संपून जाईल.
आतंकवादी हेच कारण असल्यामुळे भारतात घुसतात. कारण त्यांना माहित आहे, आपण जरी सापडलो तरी केस पूर्ण होई पर्यंत मस्त मजा करता येइल आणि नंतर कोणीतरी येइल विमान, बस वैगरे हाइजैक करतील किंवा परत होटेल मध्ये घुसून लोकांना वेठीस धरून आपल्याला सोडवतिल.
Monday, 16 May 2011
Subscribe to:
Posts (Atom)