Sunday, 13 November 2011

गुढीपाडवा (चैत्र १)

हा दिवस  साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन कामाचा प्रारंभ या दिवशी करतात. शालिवाहन शक ह्या दिवसापासून सुरु होतो. इ.स. तून ७८ वजा केले म्हणजे शालिवाहन शकाचे वर्ष निघते.


प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून सीतेसह याच दिवशी अयोध्या नगरीत पवेश केला. त्या दिवशी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. शालिवाहन राजाच्या विजयाचे स्मारक म्हणून दरवर्षी हा दिवस आनंदाने साजरा करतात.


शुभकार्ये व संकल्प करण्याचा हा मंगल मुहूर्त पाडवा होय. नवीन वर्ष सुखासमाधानात जावे म्हणून आनंदोत्सव. एकमेकांना नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा देतो. चांगल्या आरोग्यासाठी कडुलिंब (अमृतापासून उत्पत्ती)  भक्षण करतो. मागीलवर्षी झालेल्या चुका होऊ न देण्याची प्रतिज्ञा करतो. दुर्गुणापासून दूर होऊन सद्गुणांचा स्वीकार करावा असे ठरवितो. बांबू, नवीन वस्त्र, फुलांची माळ, कडुलिंब व आंबा याचे डहाळे व साखरेची गाठी बांधून गुढी पाटावर ठेवतात, त्याची पुजा करून गोड गोड पक्वान्ने करून नवीन कपडे घालून दिवस आनंदाने साजरा करतात.