Thursday 1 December 2011

वड पोर्णिमा

                       जेष्ठ शुद्ध पोर्णिमेला  वड पोर्णिमा असे म्हणतात.  या दिवशी सुवासनी वडाची पूजा करून सवित्रिच्या कथा ऐकतात. आपल्या पतीला उदंड आयुष्य मागतात.

वडाच्या झाडाला अक्षय वट असे म्हणतात, कारण एक झाडाच्या पारंब्यापसून नवे झाड तयार होते. हा वृक्ष कधीच नाश पावत नाही. त्याचा खूप मोठा विस्तार असतो. दाट पाने - गार सावली - ऐन उन्हाळ्यात हि थंड हवा हा वृक्ष देतो. पाऊस पडण्यास ह्याचा उपयोग होतो. जमिनीची धूप हा वृक्ष होऊ देत नाही. पक्षांचे निवासस्थानही हा वृक्ष असतो. जेष्ठ महिन्यात मृग नक्षत्र असते. पाऊसास  सुरुवात होते. खरिप पिकांना हा पाऊस आवश्यक असतो, म्हणून शेतकरी पावसाची वाट पहात असतात. पाऊस भरपूर पडावा, जमीन सुजला सुफला बनावी म्हणूनच या महिन्यात वृक्ष पूजा केली जाते. पतीनिष्ठेची शिकवण या वृक्ष मुले मिळते, शील, परम भूशनम हा संदेश हा सण आपल्याला देतो. घराचे सौख्य स्त्रीच्या वागणुकीवर अवलंबून असते. गृह देवतेचा सन्मान ठेवणे हे पुरुषाचे कर्तव्य आहे, हे ह्या सणामुळे दिसून येते.

Monday 21 November 2011

अक्षय्य तृतीया वैशाख शु. ३

विशाखा नक्षत्र या पौर्णिमेला चंद्राबरोबरच सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवते, म्हणून वैशाख असे नाव पूर्वजांनी ह्या महिन्याला दिले आहे.

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि : क्षत्रिय केली, त्या परशुरामाचा जन्म  अक्षय्य तृतीयेला झाला आहे. त्यांचा चिपळून जवळ ह्या दिवशी जन्म उत्सव थाटाने होतो.

पाडवा - बलिप्रतिपदा - दसरा हे तीन मुहूर्त व  अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त असे आपले साडेतीन मुहूर्त प्रसिद्ध आहेत. यादिवशी शुभ कार्य करतात. ह्या दिवशी आपण जे जे दान, पुण्य कार्य करतो ह्याचे फळ ईश्वर सतत देत असतो. हे फळ  अक्षय्य टिकणारे आहे म्हणूनच हि  अक्षय्य तृतीया होय.

सर्वात मोठे अन्नदान पण त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे जल दान. ऐन उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी दिले तर ते फार मोठे सत्कृत्य पुण्य दायक असते. म्हणून आपण जल कुंभ दान देतो. पितरांना पण अन्न व जल देऊन त्यांचे पुण्या स्मरण करतो. मग शुभ कार्याला ह्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करतो. चैत्र गौरीचे हळदी कुंकूपण ह्या दिवशी करतात.

Sunday 13 November 2011

गुढीपाडवा (चैत्र १)

हा दिवस  साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन कामाचा प्रारंभ या दिवशी करतात. शालिवाहन शक ह्या दिवसापासून सुरु होतो. इ.स. तून ७८ वजा केले म्हणजे शालिवाहन शकाचे वर्ष निघते.


प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून सीतेसह याच दिवशी अयोध्या नगरीत पवेश केला. त्या दिवशी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. शालिवाहन राजाच्या विजयाचे स्मारक म्हणून दरवर्षी हा दिवस आनंदाने साजरा करतात.


शुभकार्ये व संकल्प करण्याचा हा मंगल मुहूर्त पाडवा होय. नवीन वर्ष सुखासमाधानात जावे म्हणून आनंदोत्सव. एकमेकांना नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा देतो. चांगल्या आरोग्यासाठी कडुलिंब (अमृतापासून उत्पत्ती)  भक्षण करतो. मागीलवर्षी झालेल्या चुका होऊ न देण्याची प्रतिज्ञा करतो. दुर्गुणापासून दूर होऊन सद्गुणांचा स्वीकार करावा असे ठरवितो. बांबू, नवीन वस्त्र, फुलांची माळ, कडुलिंब व आंबा याचे डहाळे व साखरेची गाठी बांधून गुढी पाटावर ठेवतात, त्याची पुजा करून गोड गोड पक्वान्ने करून नवीन कपडे घालून दिवस आनंदाने साजरा करतात.

Thursday 25 August 2011

जन लोकपाल

भ्रष्टाचार कुणी करू नये?

तर मोठ्याने ओरडतात, सर्वांच उत्तर एकच - 'नेत्यांनी'

पण सुरुवात कोण करतो त्याचा थोडाही विचार आपण करीत नाही. आता आपण बोलतो पोलीस भ्रष्टाचार करतात त्यांना आडवा, आहो पण जर पोलिसांना तुम्हीच इमानदारिने वागून देता का? म्हणजे साधं उदहारण घ्या तुम्ही बाईक वर बिना हेलमेट ने जाताय किंवा लायसंस नाही किंवा साध्यात साध सिग्नल तोडलं आणि ट्राफिक पोलिसाने पकडल आणि पावती फाडायाला सांगितली तर आपणच चिरीमिरी देवून निघून जातो, म्हणजे आपणच याची सुरुवात करतो, आसेच साध्या साध्या गोष्टिंकडे लक्ष दिलं तर खरोखर देश  भ्रष्टाचार मुक्त होइल.

आन्ना  यांना मदत करायची असेल, खरोखर भारत  भ्रष्टाचार मुक्त   हवे असेल  तर सुरुवात   आपल्या पासून करा.

जय हिंद, जय  महाराष्ट्र,  जय   भारत

Tuesday 17 May 2011

भारत

          पाकिस्तानने म्हटलंय की अमेरिकेने जसी लादेनवर कारवाई केली तसी भारताने पाकिस्तानात घुसून करू नये नाहीतर आम्ही भारतातील भरपूर ठिकाणे लक्ष केली आहेत. खर तर पाकिस्तानला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट ती गर्वाने सांगतात.

                 पण खरं पाहिलं तर भारत तसं करूही शकत नाही, कारण कसाबने  जगासमोर अपराध करूनही त्याला अजून काही केले नाही तर ते पाकिस्तानात जाऊन काय करणार, भारताची शासन व्यवस्थाच तशी आहे.  अजुन ते कसाबबद्दल कय सिद्ध करतायेत ते देवाला माहिती. तेच जर कोण भारतीय असता आणि त्याने एकतरी अपराध केला असता तर त्याला एवाध्याला फासावर देऊन मोकले झाले असते. पाकिस्तानात जाउन जरी दाउद वैगरेना पकडल तरी त्याच्यावर केस चालविण्यात दाउदचं  आयुष्य संपून जाईल.
          
                 आतंकवादी हेच  कारण असल्यामुळे भारतात घुसतात. कारण त्यांना माहित आहे, आपण जरी सापडलो तरी केस पूर्ण होई पर्यंत मस्त मजा करता येइल आणि नंतर कोणीतरी येइल विमान, बस वैगरे हाइजैक करतील किंवा परत होटेल मध्ये घुसून लोकांना वेठीस धरून आपल्याला सोडवतिल. 

Friday 6 May 2011

Tendulkar

Akshaya Tritiya


Akshaya Tritiya also referred as Akha Teej is considered the most auspicious days of all by Hindus in India. The pious day of Akshay Trithiya falls on the third day (Tithi)of Bright phase of moon (Shukla Paksha) of Hindu month of Vaishakha. The name Akshay Trithiya describes the special planetary positions of Moon, Sun and Jupiter, as on this day all three unanimously come under Mrigshira Nakshatra. Moon and Sun both glow at their brightest level, indicating the auspiciousness of the day.
The day of Akshay Trithiya is considered highly auspicious by Hindus as the day is thought to bring good fortune and prosperity for every one. The literal meaning of Akshay in Sanskrit means imperishable or “never diminishing” and thus the day is believed to be the best time for beginning new ventures or investing money in precious metals and land.


Myths and Legends:


Akshay Trithiya is also referred as golden day of eternal success as the Golden Age or the first of the four Yugas, Satya yug began on this day. Akha Teej also marks the birthday of Sixth incarnation of Lord Vishnu - Lord Parshuram. The auspicious day also holds special importance as the holy river Ganga also descendeddown to earth from heaven on the same day. Vedavyas along with Lord Ganesha started writing the greatHindu scriptures, Mahabharatha on this day of Akshay Trithiya.
The first Tirthankar in Jainism Bhagwan Rishabdev also broke his fasting spell of one year by taking juice on the day of Akha Teej.

Special Significance
Akshaya Tritiya is also called Navanna Parvam. Akshaya Tritiya falling in a conjunction with Rohini star day is considered more auspicious.
The importance of Akshaya Tritiya appreciates when it falls on a Monday.

Wednesday 4 May 2011

Akshaya Tritiya


Akshaya Tritiya, variously spelt as Akshya Thiritiya, Akshaya Trutheeya, Akshaya Tritiiya and also called Akshaya Trithi, falling on the third day of the bright half of the lunar month of Vaisakha of the traditional Hindu calendar, is one of the four most auspicious days of the year for Hindus. The word Akshaya, a Sanskrit word, literally means one that never diminishes, and the day is believed to bring good luck and success. It is widely celebrated in all parts of India by different sections of the society irrespective of their religious faith and social grouping. The day is particularly considered auspicious for buying long term assets like gold and silver, including ornaments made of the same; diamond and other precious stones; and the real estate.

The legend states that any venture initiated on the auspicious day of Akshaya Tritiya shall continue to grow and bring prosperity. Hence, it is normal to see many of the new ventures, like starting a business, ground breaking for construction etc on the Akshaya Tritiya Day.