Sunday, 13 November 2011

गुढीपाडवा (चैत्र १)

हा दिवस  साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन कामाचा प्रारंभ या दिवशी करतात. शालिवाहन शक ह्या दिवसापासून सुरु होतो. इ.स. तून ७८ वजा केले म्हणजे शालिवाहन शकाचे वर्ष निघते.


प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून सीतेसह याच दिवशी अयोध्या नगरीत पवेश केला. त्या दिवशी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. शालिवाहन राजाच्या विजयाचे स्मारक म्हणून दरवर्षी हा दिवस आनंदाने साजरा करतात.


शुभकार्ये व संकल्प करण्याचा हा मंगल मुहूर्त पाडवा होय. नवीन वर्ष सुखासमाधानात जावे म्हणून आनंदोत्सव. एकमेकांना नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा देतो. चांगल्या आरोग्यासाठी कडुलिंब (अमृतापासून उत्पत्ती)  भक्षण करतो. मागीलवर्षी झालेल्या चुका होऊ न देण्याची प्रतिज्ञा करतो. दुर्गुणापासून दूर होऊन सद्गुणांचा स्वीकार करावा असे ठरवितो. बांबू, नवीन वस्त्र, फुलांची माळ, कडुलिंब व आंबा याचे डहाळे व साखरेची गाठी बांधून गुढी पाटावर ठेवतात, त्याची पुजा करून गोड गोड पक्वान्ने करून नवीन कपडे घालून दिवस आनंदाने साजरा करतात.

Thursday, 25 August 2011

जन लोकपाल

भ्रष्टाचार कुणी करू नये?

तर मोठ्याने ओरडतात, सर्वांच उत्तर एकच - 'नेत्यांनी'

पण सुरुवात कोण करतो त्याचा थोडाही विचार आपण करीत नाही. आता आपण बोलतो पोलीस भ्रष्टाचार करतात त्यांना आडवा, आहो पण जर पोलिसांना तुम्हीच इमानदारिने वागून देता का? म्हणजे साधं उदहारण घ्या तुम्ही बाईक वर बिना हेलमेट ने जाताय किंवा लायसंस नाही किंवा साध्यात साध सिग्नल तोडलं आणि ट्राफिक पोलिसाने पकडल आणि पावती फाडायाला सांगितली तर आपणच चिरीमिरी देवून निघून जातो, म्हणजे आपणच याची सुरुवात करतो, आसेच साध्या साध्या गोष्टिंकडे लक्ष दिलं तर खरोखर देश  भ्रष्टाचार मुक्त होइल.

आन्ना  यांना मदत करायची असेल, खरोखर भारत  भ्रष्टाचार मुक्त   हवे असेल  तर सुरुवात   आपल्या पासून करा.

जय हिंद, जय  महाराष्ट्र,  जय   भारत

Tuesday, 17 May 2011

भारत

          पाकिस्तानने म्हटलंय की अमेरिकेने जसी लादेनवर कारवाई केली तसी भारताने पाकिस्तानात घुसून करू नये नाहीतर आम्ही भारतातील भरपूर ठिकाणे लक्ष केली आहेत. खर तर पाकिस्तानला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट ती गर्वाने सांगतात.

                 पण खरं पाहिलं तर भारत तसं करूही शकत नाही, कारण कसाबने  जगासमोर अपराध करूनही त्याला अजून काही केले नाही तर ते पाकिस्तानात जाऊन काय करणार, भारताची शासन व्यवस्थाच तशी आहे.  अजुन ते कसाबबद्दल कय सिद्ध करतायेत ते देवाला माहिती. तेच जर कोण भारतीय असता आणि त्याने एकतरी अपराध केला असता तर त्याला एवाध्याला फासावर देऊन मोकले झाले असते. पाकिस्तानात जाउन जरी दाउद वैगरेना पकडल तरी त्याच्यावर केस चालविण्यात दाउदचं  आयुष्य संपून जाईल.
          
                 आतंकवादी हेच  कारण असल्यामुळे भारतात घुसतात. कारण त्यांना माहित आहे, आपण जरी सापडलो तरी केस पूर्ण होई पर्यंत मस्त मजा करता येइल आणि नंतर कोणीतरी येइल विमान, बस वैगरे हाइजैक करतील किंवा परत होटेल मध्ये घुसून लोकांना वेठीस धरून आपल्याला सोडवतिल.